आटपाडीत कुस्तीचे उन्हाळी शिबिर

आटपाडी येथील वीर हनुमान कुस्ती केंद्रात १ ते २५ मे या कालावधीत उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मल्ल घडविणाऱ्या वीर हनुमान कुस्ती केंद्रातील उन्हाळी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामदेव बडरे, पै. मोहन बडरे यांनी केले, आटपाडी येथे वीर हनुमान कला, क्रिडा, स्वयंसेवी सांस्कृतिक व व्यायाम मंडळ संचलित वीर हनुमान कुस्ती केंद्राने उन्हाळी सुट्टीत मुलांना कुस्तीचे धडे देण्यासाठी शिबिराचे आयोजन केले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅट व मातीवरील शाखोक्त प्रशिक्षण शिबिरात दिले जाणार आहे. कुस्तीचे नियम, डावपेचांची माहिती तज्ज्ञांमार्फत दिले जाणार आहेत. शिवाय व्यक्तीमत्त्व विकास, संस्कारक्षम प्रबोधनात्मक मार्गदर्शन शिबिरार्थीना केले जाणार आहे. २५ दिवसाच्या शिबिरात परिपूर्ण मार्गदर्शन व सराव घेतला जाणार आहे. निवास, प्रशिक्षण, अहाराची सोय शिबिरार्थींची करण्यात आली आहे. शिबिरानंतर प्रमाणपत्रासह कीट प्रदान केले जाणार आहे.

आटपाडीसह सांगली जिल्हयातील कुस्तीप्रेमींनी या आरोग्य सक्षम बनविणाऱ्या कुस्ती प्रशिक्षण शिबीरात सहभागी होण्यासाठी पै. नामदेव बडरे, पै. मोहन बडरे, पै. प्रकाश पाटील, पै.सतिश मुढे, पै.सुदर्शन बडरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही वीर हनुमान कुस्ती केंद्राने केले आहे.