आटपाडी येथे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना 

आटपाडी कृषी विभागामार्फत तालुक्यातील शेतक-यांसाठी किसान सन्मान योजना, शेती कर्ज, व इतर विविध सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये ॲग्रीस्टिक वर फारमर आयडी काढण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकर्यांना मार्गदर्शन आणि देहात कंपनी कडून शेतकरीयांना परिसंवाद व चर्चासत्र कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यामध्ये देहात कंपनीमार्फत बियाण्यापासून बाजारपेठेपर्यंत डी डब्ल्यू एस () – ५५५ आणि ७७७ संशोधित गहू -पीक पाहणी व चर्चासत्र कार्यक्रम आटपाडी येथील आश्रम शाळेच्या पाठीमागे जुना आटपाडी सांगोला रोड करलाचा मळा येथे हा संपन्न झाला. याप्रसंगी प्रगतशील शेतकरी शिवाजी पाटील रामचंद्र देशमुख प्रदीप पाटील व देहात.

यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी बहुमोल्य मार्गदर्शन आटपाडी तालुक्यातील क्रुषी सहाय्यक अधीकारी, विशाल कवटे, शिवकन्या इंगळे- मोरे, आकीब शेख, सोपान लाहे, अनिकेत चौधरी, हनुमंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. कृषी विभागामार्फत शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सर्व शेतकरी यांनी अॅग्रीस्टिक वर नोदणी करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वानी लवकरात लवकर नोदणी करण्याचे आवाहन कृषी सहाय्यक अधिकारी यांनी केले केले.

आटपाडी कृषी विभागाकडून दि. ८, ९ वा १० मार्च रोजी तहसील कार्यालय आटपाडी येथे अनेक योजना संदर्भात शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन मोहीम आयोजित करण्यात आली आहे. तरी मार्गदर्शन व चर्चासत्र याचा सर्व शेतकर्यांना लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.