इचलकरंजीत सभेसाठी आलेल्या उदय सहकारी साखर कारखान्याचे संचालक पंडितराव शेळके यांचे निधन

इचलकरंजी येथे सत्यजित पाटील यांच्या सभेसाठी गेलेले उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक व डोणोलीचे माजी सरपंच पंडितराव बापू शेळके यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.इचलकरंजी येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी पंडितराव शेळके सभास्थळी पोहोचले येथे उमेदवार सत्यजित पाटील यांची भेट घेतली व सभा मंडपात बसण्यासाठी जात असताना अचानक चक्कर आली.

त्यांना तत्काळ इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे हलवण्यात आले.परंतु वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. सभेसाठी आलेले जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड व डोणोली परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी रुग्णालयामध्ये गर्दी केली होती.