उद्या सायं. ६ नंतर प्रचार सभांना बंदी!

कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होत आहे. मतदानाच्या ४८ तास आधी म्हणजे, उद्या रविवारी सायं. ६ वाजल्यापासून मतदान संपेपर्यंत प्रचार करता येणार नाही, सभा घेता येणार नाही. बेकायदेशीर जमाव जमवणे आणि सार्वजनिक सभा, बैठका घेणे, पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास
त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी दिला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, निवडणूक प्रक्रिया विनाअडथळा व भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी हा मनाई आदेश काढण्यात आला आहे.