कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये धक्कादायक आत्महत्यांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे धक्क्यांवर धक्का देणाऱ्या घटना घडत आहेत. आता अशीच एक धक्कादायक घटना गडहिंग्लज तालुक्यामध्ये घडली. वयाची चाळीशी सुद्धा न गाठलेल्या तरुण शेतकऱ्याने गावातील त्रास देणाऱ्या संस्थांची नावे गोट्यातील भिंतींवर कोळशाने लिहून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने गडहिंग्लज तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.
सिद्धेश्वर रामचंद्र कानडे (वय 39 रा. औरनाळ, बसथांब्यानजीक दुंडगे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी त्रास दिलेल्यांची नावे कोळशाने गोट्यातील भिंतीवर लिहिली आहेत. ही धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण असा मोठा परिवार आहे. गडहिंग्लज पोलिसात या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
गोठ्यात वैरण टाकण्यासाठी गेल्यानंतर प्रकार उघडकीस
सिद्धेश्वर कानडी यांचा शेतीसह भाजीपाला आणि फळे विक्रीचा व्यवसाय होता. व्यवासायातून कर्जबाजारी झाल्याने ते दारूच्या आहारी गेले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली होती. सोमवारी सिदेश्वर यांची आई बाजारासाठी गडहिंग्लजकडे गेली होती. यावेळी दुपारच्या सुमारास घरी कोणी नसल्याचे पाहून गोठ्यातील तुळई गळफास लावून आत्महत्या केली. आई बाजार करून घरी आल्यानंतर गोठ्यात वैरण टाकण्यासाठी गेल्यानंतर सिदेश्वरने यांनी आत्महत्या केल्याचे लक्षात आले.
त्रास देणाऱ्यांची नावं सिद्धेश्वरने गोठ्यातील भिंतीवर लिहून ठेवली
सिद्धेश्वर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी गोट्यातील भिंतींवर नावे लिहून ठेवली आहेत. यामध्ये उत्तूरमधील दूध संस्था, गडहिंग्लजमधील महिलेसह दुंडगे व गडहिंग्लजमधील एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे सिद्धेश्वरने गोठ्यातील भिंतीवर कोळशाने लिहून ठेवले आहे, याची चर्चा घटनास्थळी चांगलीच रंगली आहे.