टीका-टिप्पणी करणे सोपे, विरोधकांना कामातून उत्तर पेठ येथे जाहीर सभेत धैर्यशील माने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राहुल महाडिक, सत्यजीत देशमुख, सम्राट महाडिक, प्रा. मच्छिंद्र सकटे उपस्थित होते.मी कामाचा खासदार आहे, नावाचा खासदार नाही. मी रोज आलो आणि कामच केले नाही तर काय उपयोग? टीका करणे सोपे असते, पण आपण कामातून विरोधकांना उत्तर दिल्याचा टोला खासदार धैर्यशील माने यांनी शेट्टी यांचे नाव न घेता लगावला. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पेठ येथे जाहीर सभा झाली.
यावेळी आमदार मानसिंगराव नाईक यांना उद्देशून सम्राट महाडिक म्हणाले, २००९ ला नानासाहेब महाडिक यांच्यामुळे तुम्ही आमदार झालात. २०१४ साली आम्ही तुमच्याबरोबर नव्हतो, तर तुम्ही पराभूत झाला. २०१९ ला मी निवडणूक लढवली नसती, तर तुमचा ५० हजार मतांनी पराभव झाला असता. तुम्ही जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनाही फसवत आहात. तुम्ही शरद पवार गटाचे की अजित पवार गटाचे? हे जनतेसमोर जाहीर करा. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, सत्यजीत देशमुख, सम्राट महाडिक, प्रा.मच्छिंद्र सकटे, मोहनराव मदने, जगन्नाथ माळी, डॉ. सचिन पाटील आदी उपस्थित होते.
