‘बिल्ला-चिक्या’ मसाई पठार केसरीचे मानकरी म्हाळुंगेत बैलगाडी शर्यत, हारण्या-शंभू द्वितीय तर सुंदर-काले जोडी तृतीय

म्हाळुंगे (ता. पन्हाळा) येथे झालेल्या मसाई पठार केसरी बैलगाडी शर्यतीत खुल्या गटात वाघवाडी येथील उदय वाघ व संता मामा यांच्या बिल्ला-चिक्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत केसरीचा मान मिळवला.

आंबा येथील हारण्या-शंभू बैलजोडीने दुसरा, तर काले येथील सुंदर-काले या बैलजोडीने तिसरा क्रमांक मिळवला. याचप्रमाणे आदत खोंड गटात वाघवाडी येथील बादल-चिक्या जोडीने प्रथम क्रमांक मिळवला. भागाईवाडी येथील सृष्टी चव्हाण यांच्या जोडीने दुसरा, तर कणदूर येथील एकनाथ कणदूरकर यांच्या जोडीने तिसरा क्रमांक पटकावला.

मसाई पठारावर पार पडलेल्या या स्पर्धेत कराड, सांगली, ईश्वरपूर, शिराळा, आजरा, गगनबावडा, राधानगरी, करवीर, शाहूवाडी, पन्हाळा आदी परिसरातून मोठ्या संख्येने बैलगाडा मालक व शौकीन उपस्थित होते. स्पर्धा खुला व आदत अशा दोन गटांत घेण्यात आली. दोन्ही गटांत पहिल्या दहा क्रमांकांना रोख रक्कम व मानाची ढाल बक्षीस दिले.

स्पर्धेसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदूरकर, आपटी उपसरपंच आशिष पाटील, आंबवडे उपसरपंच सरदार पाटील, हर्षद बच्चे-पाटील, सचिन पाटील, सरदार चिले आदींचे सहकार्य लाभले.

समालोचक म्हणून संभाजी यादव, तर टाइम किपर म्हणून राहुल पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी दीपक महाडिक, सागर वरेकर, अक्षय महाडिक, अनिल महाडिक, जयेश खेतल, राहुल आदींसह म्हाळुंगे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

खुल्या गटातील अन्य विजेते

चौथा – स्वप्निल सटाले (भाटशिरगाव), पाचवा – बबल्या प्रेमी (आजरा) यांची रोमन-शिवा, सहावा – सुरेश पाटील (गोटखिंडी), सातवा – शिवांश भोसले व पांडुरंग पाटील (सुरूल), आठवा – अमय दामले (आजरा) यांची सोन्या-सिकंदर, नववा – बेबीताई देसाई यांची बटण-येडाबाज्या, दहावा – आदिनाथ घावरे (आडोली) यांची परश्या-गण्या.

आदत खोंड गटातील अन्य विजेते

चौथा – संतोष मदने (थेरगाव), पाचवा – श्रेष्ठा राऊत (अमरावती) व मथूरशेठ बबल्या प्रेमी (आजरा), सहावा – बाळू पाटील (आंबा), सातवा – सिद्धेश ड्रायव्हर (शिराळा), आठवा – राजा मानक्या बबऱ्या प्रेमी (मानेवाडी), नववा – भैरवनाथ प्रसन्न (सागाव), दहावा – सुवर्णाताई खोत (काऊरवाडी).