बारामतीजवळ शेतात शिकाऊ विमान कोसळलं,नेमकं चाललंय तरी काय?

पुण्यातील बारामतीजवळ विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. बारामतीतील कटफलजवळील शेतात हे विमान कोसळलं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

रेड बर्ड कंपनीचं हे विमान आहे. शिकाऊ पायलट हे विमान चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आठवडाभरातील विमान दुर्घटनेची ही दुसरी घटना आहे.

अपघातात विमानाच्या समोरील भागाचं मोठं नुकसान झालं आहे. अपघातानंतर विमान उलटं झालं आहे. आजच्या अपघातात नेमकं कारण काय याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. विमान अपघातात पायलट जखमी झाल्याची माहिती आहे. 

रेड बर्ड कंपनीचे विमान बारामती विमानतळाजवळ कोसळलं होतं. त्यानंतर आज पुन्हा घडलेल्या दुर्घटनेमुळे वैमानिकांसह आसपासच्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बारामतीत विमान प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे. मात्र मागील काही दिवसात ही पाचवी दुर्घटना असल्याने ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे या दुर्घटनांचं नेमंक कारण काय याचा तपास करण्याची आवश्यकता आहे.