शनिवारी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान!

अलीकडे अनेक कार्यक्रमात वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. स्पर्धा, मनोरंजन कार्यक्रम हे घेतले जातातच. पण अलीकडे प्रत्येकाचा कल हा कुस्त्यांकडे जास्त असलेला पहायला मिळत आहे. अक्षयतृतीया व शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून कुर्ली (ता. खानापूर) येथे शनिवार, दि. ११ मे रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होत असून या मैदानात पहिल्या क्रमांकासाठी २ लाख रुपयांचे इनाम देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील विरुद्ध हरियाणाच्या मंडोती आखाड्याचा मल्ल पै. बिन्ना कुमार यांच्यात पहिल्या इनामासाठी लढत होत आहे. या कुस्ती आखाड्यात दुसऱ्या क्रमांकासाठी सांगलीच्या भोसले व्यायाम शाळेचा मल्ल पै. संदीप मोठे विरुद्ध अकलूजच्या शिवसेरी तालीमचा पै. संतोष जगताप यांच्यात तिसऱ्या क्रमांकासाठी सांगलीचा पै. सुबोध पाटील विरुद्ध हरियाणाचा पै. पवन कुमार यांच्यात निकाली कुस्ती होणार आहे.

या दोन्ही कुस्तीसाठी प्रत्येकी १ लाख ५० इनाम आहे. या कुस्ती आखाड्यात चौथा क्रमांक ७५ हजार रुपयांच्या इनामासाठी बेणापूरचा पै. अभिषेक देवकर विरुद्ध सांगलीचा पै. सचिन ठोंबरे यांच्यात पाचव्या क्रमाक ४० हजार रुपये इनामासाठी बेणापूरचा पै. नाथा पवार विरुद्ध सांगलीचा पै. दत्ता खोत यांच्यात तर सहाव्या क्रमांकासाठी विटा येथील आदर्श कुस्ती केंद्राचा पै. समाधान कोळी विरुद्ध कुंडलच्या क्रांती कारखान्याचा पै. अनिकेत गावडे यांच्यात सामना होत आहे. या कुस्तीसाठी ३५ हजार रुपयांचे इनाम ठेवले आहे.

तसेच ७ व्या क्रमांकासाठी मांजर्डेचा पै. स्वप्निल पाटील विरुद्ध विट्याचा पै. सम्राट पाटील यांच्यात रोख ३० हजार रुपयांसाठी तर आठवा क्रमांक २५ हजार रुपयांसाठी अकलूजचा पै. दिनकर भोसले विरुद्ध बेणापूरचा पै. शंतनू शिंदे यांच्यात लढत तर नवव्या क्रमांकासाठी सांगलीचा पै. संग्राम सूर्यवंशी विरुद्ध बेणापूरचा पै. सोमनाथ बंडलकर यांच्यात कुस्ती होणार आहे. या कुस्तीसाठी २० हजार रुपयांचे इनाम ठेवले आहे.