तरुणांना भारतीय नौदलात सामील होण्याची एक नामी संधी चालून आली आहे. नौदलाने अग्निवीर SSR आणि MR पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार १३ मेपासून उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार joinIndiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे या पदांसाठी अर्ज भरू शकणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
उमेदवार १३ मे ते २७ मे २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात.
आवश्यक पात्रता :
भारतीय नौदल अग्निवीर SSR-MR भरती २०२४ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून किमान ५० % गुणांसह मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा :
१ नोव्हेंबर २००३ ते ३० एप्रिल २००७ दरम्यान जन्मलेले उमेदवारच या पदांसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्काविषयी :
भारतीय नौदलाच्या अग्निवीर SSR-MR भरती २०२४ साठी अर्ज करणाऱ्या सर्व श्रेणीतील उमेदवारांना ५५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. हे शुल्क विनापरतावा तत्वावर घेतले जाणार आहेत.
अशी असणार परीक्षा :
- भारतीय नौदलातील अग्निवीर SSR-MR भरती २०२४ साठी घेण्यात येणारी परीक्षा संगणकावर आधारित असेल.
- या पेपरमध्ये १०० प्रश्न असतील. ज्यातील, प्रत्येक प्रश्न १ गुणाचा असेल.
- प्रश्नपत्रिकेत चार विभाग असतील, ज्यामध्ये इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सामान्य जागरूकता विषयांशी संबंधित प्रश्न विचारले जातील.
- परीक्षेचा कालावधी एक तासाचा असेल.
- प्रत्येक विभागातील उत्तीर्ण गुण आणि एकूणच भारतीय नौदलाद्वारे निश्चित केले जाईल.
भारतीय नौदलातील नोकरीसाठी असा करा अर्ज :
- सर्व उमेदवार सर्वप्रथम joinIndiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- आता मुख्यपृष्ठावरील “नोंदणी” टॅबवर क्लिक करा.
- आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह नोंदणी करा.
- वैध क्रेडेन्शियल्ससह लॉग इन करा आणि अर्ज भरा.
- यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- आता अर्जाची फी भरा.
- अर्जाची प्रिंटआउट घ्या.