बेंगळुरु- कर्नाटक राज्यातील दहावी (एसएसएलसी) परीक्षा-१ चा निकाल आज जाहीर!

बेंगळुरु- कर्नाटक राज्यातील दहावी (एसएसएलसी) परीक्षा-१ चा निकाल (10th Exam Result) आज जाहीर झाला. कर्नाटक शाळा परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रसिद्धी पत्रकानुकार, विद्यार्थी https://karresults.nic.in या वेबसाइटवर निकाल पाहू शकतात.कर्नाटकातील दहावी परीक्षा २५ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान झाली होती. एसएसएलसी परीक्षेसाठी (SSLC Exam) ८.६९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४.४१ लाख मुले आणि ४.२८ मुलींनी परीक्षा दिल्याची माहिती आहे.

यामध्ये ४१,३७४ रिपिटर आणि ५,४२४ दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २,७५० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली होती.sslc.karnataka.gov.in, kseeb.kar.nic.in, karnataka.gov.in, आणि karresults.nic.in. या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ७३.४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत ही टक्केवारी कमी आहे.