हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुक बहुरंगी झाली. मात्र पहिल्या तीन तुल्यबळ उमेदवारांच्या लढतीने रंगत वाढली आहे. यंदाची इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ कुणाला तारणार, याचा अंदाज बांधण्यात सगळे राजकीय जाणकार गर्क झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची चर्चा आहे.
वाळवा तालुक्यातील संघटनात्मक आणि संस्थात्मक बळाच्या जोरावर जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. हातकणंगले मतदारसंघातील उद्धवसेनेची उमेदवारी सत्यजित पाटील यांना देण्यामागे जयंत पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.