इस्लामपूर येथील सद्गुरू आश्रमशाळेत सुमन जाधव यांचा अमृत सोहळा संपन्न

शिक्षण सर्वांना मिळावं असं वाटत असेल, तर शिक्षण धोरणामध्ये बदल करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. मेघा पानसरे यांनी केले. इस्लामपूर येथील सद्गुरू आश्रमशाळेत सुमन जाधव यांच्या अमृत सोहळ्यानिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. आ. जयंत पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, खा. धैर्यशील माने, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, काँग्रेसच्या नेत्या शैलजा पाटील, जिल्हाबँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, सुनीतादेवी नाईक, यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज कार्यक्रमाला उपस्थित होते.

डॉ. मेघा पानसरे पुढे म्हणाल्या, गोरगरिबांना शिक्षण हा महाराष्ट्राचा वारसा पुढे न्यायचा असेल, भावी पिढी शिक्षित करायची असेल, तर दीर्घकाळ संघर्ष करण्याची आज वेळ आली आहे. संस्थापक सचिव एकनाथराव जाधव, सहसचिव सत्यजित जाधव, संचालक रणजित जाधव, मुख्याध्यापक सचिन पाटील, आष्पाक आत्तार भाजपचे राहुल महाडिक उपस्थित होते. वैशाली गायकवाड यांनी स्वागत केले. वृषाली पवार यांनी सूत्रसंचालन केले. शीतल माळी यांनी आभार मानले.