मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा होणार आहे. 5500 रूपयांचं हे दिवाळी गिफ्ट महिलांना दिले जाणार आहे. या दिवाळी बोनससाठी सरकारने काही अटी देखील ठेवल्या आहेत.या अटीत बसणाऱ्या महिलांच्याच खात्यात 5500 जमा होणार आहे. पण हा दिवाळी बोनस नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? हे जाणून घेऊयात.
आता काही महिलांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे चौथ्या हप्त्याचे 3000 रूपये आणि 2500 मिळून महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार आहेत.
पात्र होण्यासाठी अटी काय?
1) महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
2) महिलांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
3) त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
4) ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.
ज्या महिला या अटीत बसतात त्याच महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार असल्याची चर्चा आहे. पण हे पैसे महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? याबाबतची कोणतीच अपडेट अद्याप तरी समोर आली नाही आहे. त्यामुळे आता महिलांना यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.