इचलकरंजी हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा दिलेला होता. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश यांनी महानगरपालिकेची दिवटे आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश संबंधित विभागास दिले होते. त्यामुळे काल झालेल्या वादळी वाऱ्याने ठिकठिकाणी पडलेली झाडे हटविण्यात यश आले. शनिवार दि. ११ मे रोजी सायंकाळी शहरासह आजुबाजुच्या परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसान सुरुवात केली वादळामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाड पडली होती.
यापैकी पुजारी मळा येथील पडलेले महानगरपालिका यंत्रणेने काढून घेतले.
त्याचबरोबर शहरात काही ठिकाणी मोठ्या गटारीचे पाणी तुंबलेले होते सदर ठिकाणी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने गटारींची स्वच्छता करून घेतली.