शॉर्टसर्किटमुळे दोन कापड दुकानांना आग; लाखाे रूपयांचे नुकसान

सोलापूर शहरातील जुन्या महापालिकेलगत असलेल्या दोन कपड्यांच्या दुकानांना आज शुक्रवारी मध्यरात्री कपड्यांच्या दोन दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागली.यात दुकानातील कपडे जळून खाक झाली. त्याची झळ बाजूलाच असलेल्या दुकानांना पण बसली. ही घटना आज शुक्रवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अग्निशामक दल दाखल होताच आगीवर नियंत्रण मिळवून इतर दुकानांचे नुकसान टळले. दुकान बंद असल्याने उशिरा हा प्रकार उघड झाला. तोपर्यंत कापड दुकान पूर्णतः जळून खाक झाले होते.

आगीमध्ये लाखोंचा कापड माल जळून खाक झाला. मध्यरात्रीची घटना असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. २० लाखांचे नुकसान असल्याचे दुकान मालकांचे म्हणणे आहे. मनोहर दासरी आणि जय विजय पवार यांच्या मालकीची ही दुकाने आहेत. या दोन्ही दुकानाच्या जवळच विद्युत डीपी आहे. दुकानदारांनी दिलेल्या माहितीवरून वारंवार या ठिकाणी डीपीमध्ये शॉर्टसर्किट होते. यामुळेच ही आग लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ही घटना सकाळी समजताच या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अग्निशमन दलाने सामुहिक प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली. मुख्य बाजारपेठेतील मोठी दुर्घटना टळली.