मराठा आरक्षणासाठी दुसऱ्या दिवशी रस्ता रोको ! आठवडा बाजार बंद

मराठा आरक्षणासंदर्भात जोपर्यंत अधिवेशन घेऊन कायदा मंजूर होत नाही व मराठा बांधवावरील गुन्हे मागे घेतलेले जात नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका घेतलेल्या आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची 8 व्या दिवशी प्रकृती खालावल्यामुळे मराठा बांधवांच्या भावना तीव्र झाल्याने मरवडे येथील सकल मराठा बांधवानी रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे पंढरपूर -विजयपूर या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली तर दर शनिवारी भरणारा आठवडा बाजार आज बंद ठेवण्यात आला आहे.

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून झालेल्या आंदोलनात मंगळवेढ्यातील सकल मराठा बांधव आग्रही राहिली. सध्या मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. मात्र यावर अद्याप तोडगा न निघाल्यामुळे सरकार बद्दल समाजाच्या बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त सुरू झाले आहे.

काल मरवडे येथील मराठा बांधवांनी भगव्या टोप्यावर, झेंडे परिधान करून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा आंदोलकांनी भर रस्त्यावर ठिय्या मांडला पंढरपूर विजयपूर मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली.