महानगरपालिका झाली अलर्ट! नागरिकांना दिल्या सूचना

जाहीरात होर्डिंग कोसळून मुंबईत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने तातडीने शहरातील होर्डिंग व्यवसायीकांची बैठक घेतली.शहरात लावलेल्या होर्डिंगची स्टॅबिलीटी तपासून घ्यावी तसेच ‘वादळी वाऱ्याच्या वेळी होर्डिंगखाली कोणीही थांबू नये’ असे फलक होर्डिंगच्या खाली लावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

वादळी वारे तसेच जोराच्या पावसाने शहरात होर्डिंग कोसळण्याची घटना घडणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घ्यावी, अशी सूचना उपायुक्त साधना पाटील यांनी बैठकीत केली. कोल्हापुरात चार होर्डिंग बेकादेशीर असून संबंधितांना तातडीने ते उतरवून घेण्याची नोटीस दिल्याचे इस्टेट अधिकारी विलास साळोखे यांनी सांगितले.