कोल्हापूर जिल्हा बँकेची नावीन्यपूर्ण योजना!मिळणार ५ लाख रुपये कर्ज

कोल्हापूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींच्या हाताला उद्योग वाढीसाठी एक उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांना रोजगार देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत शेतजमीन तारणावर कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला.संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ होते.पाच लाखांच्या कर्जासाठी २० गुंठे जमीन तारण देता येणार आहे. यासाठी कर्जदाराची आणि सहकर्जदारांची बिगर शेती जमीन तारणाची अट शिथिल केली आहे. जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामीण भागात अद्यापही सिटी सर्वे झालेला नसल्यामुळे बिगरशेती तारण देताना कर्जदाराला अडचणी येत आहेत. ती अट रद्द करून ही नवी सुधारणा केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने उद्योजकतेला चालना देण्यासाठी सर्वसमावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या कार्यक्रमांतर्गत कृषी पूरक व्यवसाय कृषी आधारित उद्योग, वाहतूक सेवा उद्योग यामधील रोजगार आणि स्वयंरोजगारांच्या नवीन संधींचा विचार केला आहे. जिल्हा बँकेने ही योजना प्रभावीपणे राबविली आहे.

पात्रता

कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असायला हवा, अर्जदाराचे वय कमाल ४५ वर्षे असावे, वीस लाखांपर्यंतच्या प्रकल्पासाठी सातवी तर २५ लाखांपर्यंतसाठी दहावी पास बंधनकारक, कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार लाभ, उत्पादन व सेवा याअंतर्गत येणारे प्रकल्प पात्र राहतील.

सात वर्षे परफेड, १२ टक्के व्याज, मध्यम मुदत कर्ज परतफेडीचा कालावधी ५ कालावधी ५ ते ७ वर्षे अहे. त्यासाठी दर साल दर शेकडा १२ टक्क्यांप्रमाणे व्याजाची आकारणी केली जाणार आहे.

जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत. त्यातील ही महत्त्वपूर्ण असून, त्याचा लाभ सुशिक्षित बेरोजगारांनी घ्यावा असे आवाहन जी. एम. शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक यांनी केले आहे.