कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, ऊरुस, सण इ. साजरे होणार असून विविध पक्ष, संघटनांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण, मोर्चा, इत्यादी प्रकारचे आंदोलन करण्यात येते. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात दिनांक ३१ जुलै रोजी सकाळी ६ ते दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये बंदी आदेश जारी करण्यात येत असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी कळविले आहे.
१४ ऑगस्टपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू
