उजनी धरणातून १० मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता ६ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. हे पाणी २० मे रोजी औज बंधाऱ्यात पोहचेल. तोपर्यंत भीमा नदीच्या पात्रातील परिसरात दोन तास वीजपुरवठा करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने वीज मंडळास दिला.ही माहिती उजनी लाभक्षेत्राचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली. शहराला पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातील मृत साठ्यातून पाणी सोडण्यात आले.
शहराजवळील दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज व चिंचपूर बंधारा पूर्ण क्षमतेने साडेचार मीटर भरण्यात येणार आहे.अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी विद्युत मोटारची वीज केवळ रोज दोन तास सुरू ठेवण्यात येणार आहे. २० मेनंतर सहा तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय होऊ शकतो.
या गावातील नदीकाठचा वीजपुरवठा दोन तास सुरू
गारअकोले, टाकळी, राजणी, मिटकलवाडी, बेंबळे, आलेगाव (माढा), संगम, बाभूळगाव, लवंग, वाघोली, वाफेगाव, नेवरे, उबरे, मिरे, कोढरपट्टा, शेवरे, जांभूड, खवळ, दसूर (माळशिरस). पिराची कुरोली, वाडीकुरोली, नांदोरे, आवे, शेवरे, तरटगाव, पटवर्धन कुरोली, भोसे, भंडीशेगाव, खेड, भाळवणे, शेवते, शिरढोण, कवठाळी, वाखरी, इसबावी, देवडे, शेळवे, खेडभोसे, होळे, गुरसाळे, अजनसोड, सुस्ते, तारापूर, खरसोळी, पोहोरगाव, शंकरगाव, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, चळे, आंबे, सरकोली, अंबेचिचोळी, नळी, पुळूज, टाकळी (पंढरपूर).
उचेठाण, बठाण, ब्रम्हपूरी, माचणूर, रहाटेवाडी, सिध्दापूर, तामदर्डी, तांडूर, अरळी (मंगळवेढा). अर्धनारी, वडदेगाव, बेगमपूर, मिरी, वडापूर (मोहोळ). तेलगाव, मिरी, खानापूर, कुसूर, विंचूर, भंडारकवठे, लवंगी, सादेपूर, औज, कारकल, चिंचपूर, टाकळी, कुरघोट (दक्षिण सोलापूर).