इंडियन आयडॉल विजेती अंजली नंदिनी गायकवाड यांच्या स्वरांनी अवघा रंग एक झाला

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर आयोजित सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब सर्व सन्मानीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवात आजचे सहावे स्वरपुष्प इंडियन आयडॉल विजेती अंजली नंदिनी गायकवाड यांनी गुंफले. सुरुवातीला सदस्य श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर सदस्या शकुंतला नडगिरे मॅडम अंजली नंदिनी गायकवाड अंगद गायकवाड यांच्या शुभहस्ते विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून गायनसेवेला सुरुवात झाली.

सुरुवातीला वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र जय जय राम कृष्ण हरी ने सुरुवात करुन आवडे हे रुप, माझे कोण आहे तुजवीण येई ओ विठ्ठले, कानडा राजा पंढरीचा, घेई छंद मकरंद, अवघेचि तीर्थे, जय आणि शेवटी अवघा रंग एक झाला गानसरस्वती किशोरी आमोणकर यांची गाजलेली रचना गाऊन सर्व कलारसिकांना भक्तिरसाच्या सागरात चिंब करत अविस्मरणीय आनंद दिला. त्यांना तितकीच अप्रतिम आणि दमदार साथसंगत हार्मोनियम गुरु आणि वडील अंगद गायकवाड, तबलासाथ ओंकार इंगवले पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ शिवराज पंडीत नयन राजूरकर यांनी सुंदर केली.

ध्वनी व्यवस्था आरती स्पिकर भैय्या मनमाडकर यांनी सुंदर केली, सुंदर सुत्रसंचलन विक्रम बिस्किटे सरांनी केले. या सुरू असलेल्या संगीत महोत्सवाला अनेक कलारसिकांची उपस्थिती भरभरून असल्याने महोत्सव यशस्वी झाल्याचे दिसून आले. सर्व कलारसिकांनी सर्व सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करुन सुरांची अप्रतिम मेजवानी दिल्या बद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विशेष आभार मानले. हा संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती सर्व कर्मचारी मनोभावे परिश्रम घेतले.