वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश; ११ प्लस ११ पदकांची कमाई

दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी टोली चौकी लिमरा गार्डन हॉल येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सरांच्या कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांनी कता प्रकारामध्ये ११ कुमिते फाईट प्रकारामध्येये ११ असे २२ पथकांची कमाई करून घवघवीत यश मिळविले. सुवर्णपदक कता- गुरुराज पांढरे, निजेंद्र चौधरी रौप्य पदक – आशिष कोकरे, शिवराज कळसुले, रोहित अरबळी, यश कोकरे, तेजस कांबळे, कल्याणी गावडे, अक्षरा गावडे कास्यपदक- विराज सूर्यवंशी, अर्ष मुलाणी कुमिते फाईट प्रकारामध्ये सुवर्णपदक- आशिष कोकरे, निजेन्द्र चौधरी, शिवराज कळसुले, अक्षरा गावडे, कल्याणी गावडे, अर्ध मुलाणी.

कुमिते रौप्य पदक विराज सूर्यवंशी, रोहित अरबळी, तेजस कांबळे, यश कोकरे, गुरुराज पांढरे कांस्यपदक- रोहित अरबळी. असे एकूण २२ पदके प्राप्त केली. सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री सुनील वाघमारे सर यांचे मार्गदर्शन लाभले. यापैकी अक्षरा गावडे, कल्याणी गावडे यांनी मागील दोन महिन्यापूर्वी वेस्टर्न झोन गोवा येथे मेडल पटकावून यश संपादन केले होते. आता त्या दोघी बहिणीने हैदराबाद येथील राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये चार पदके पटकाविले आहते. त्यांच्या या यशाबद्दल वाघमारे सरांचे व प्रशिक्षणार्थीचे सर्वत्र कौतुक होत आहे.