सांगोला तालुका म्हणून सर्वत्र जगजाहीर आहेच. पाण्याची तीव्र टंचाई जाणवतेच अशातच सांगोला तालुक्यातील काही गावातील लोकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. तर सांगोला तालुक्यातील चोपडी हे गाव लोकसंख्येने मोठे असून प्रवासी व विद्यार्थी यांना आटपाडी व सांगोला या ठिकाणी ये जा करण्यासाठी मोठी गैरसोय होत होती.
ही अडचण लक्षात घेऊन उपसरपंच पोपट यादव, पत्रकार दशरथ बाबर यांनी गेल्या तीन महिन्यापासून सांगोला एसटी आगार प्रमुख विकास पोपळे यांच्याशी पत्रव्यवहार करून व वारंवार भेट घेऊन सांगोल्याहून सकाळी ११ वाजता व दुपारी ३: ३० वाजता, सांगोल्याहून चोपडीमार्गे आटपाडीकडे जाण्यासाठी एसटी बसची सोय उपलब्ध केली आहे. सदर बस
सकाळी ११ वाजता सांगोल्याहून निघणार आहे. ही गाडी सकाळी १२ वाजता चोपडी येथे पोहोचेल व परत चोपडी मार्गे सांगोल्याकडे मार्गस्थ होईल.
दुपारी, सांगोल्याहून ३:३० वाजता सोडण्यात येणारी एसटी बस ४:१५ ते ४:३० या वेळेत चोपडी येथे पोहोचेल या दोन्ही बसेस चोपडी मार्गेच सांगोल्याकडे परत रवाना होतील, तरी प्रवासी व विद्यार्थी यांनी आपल्या महत्वाच्या कामासाठी एसटी बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुख विकास पोपळे यांनी केले आहे.
१४ मे पासून हि बस सेवा सुरु करण्यात आलेली आहे.