पाचगणीतून भरकटलेले पॅराग्लाइडर उतरले दिघंचीच्या माळावर

सातारा जिल्ह्यातील पाचगणीतून भरकटलेले पॅराग्लाइडर सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दिघंची (ता. आटपाडी) येथे उपसरपंच तेजश्री मोरे याच्या शेतात उतरले. सुटी घालवण्यासाठी भारतात आलेला फ्रेंच नागरिक पियर अलेक्स हा पाचगणी येथून पॅराग्लाइडिंग करताना तब्बल सहा तास भरकटला.आवळाई रस्त्यावरील मोरे यांच्या शेतात उतरल्यानंतर त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली हाेती.

युवकांनी पाहुणचार करून या परदेशी पाहुण्याला खासगी माेटारीतून पाचगणीस रवाना केले. मागील आठवड्यातही पिअर अलेक्स भरकटून सांगोला तालुक्यातील इटकी येथे आला होता.