दोन दिवसांपूर्वी आटपाडी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले खासदार विशाल पाटील यांनी आटपाडी शहराकडे येणाऱ्या मुख्य रस्त्याबाबत दुर्लक्ष केल्याचा आरोप करत काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील यांचे पुत्र अभियंता महेश पाटील यांनी खड्डयात बसूनच खासदार विशाल पाटील यांचा निषेध केला.
आटपाडी शहरातील साईमंदिर ते बसस्थानक, शेटफळे चौक, सांगोला चौक, नगरपंचायतमार्गे अण्णा भाऊ साठे चौकापर्यंतच्या रस्त्याची विदारक अवस्था आहे. या रस्त्याची पूर्ण चाळण आटपाडी येथील खड्डेमय रस्त्यावर बसून महेश पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांचा निषेध केला. परिणामी वाहनधारक, नागरिकांना मार्ग काढताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु या गंभीर प्रश्नाकडे खासदारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत महेश पाटील यांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून निषेध नोंदविला. उपाययोजना होत नाहीत. शिवाय रस्त्याबाबत बांधकाम विभाग निद्रिस्त आहे.
साई मंदिरापासून शहरामध्ये येणारा मुख्य रस्ता गेली पाच वर्षे दुरुस्त केला जात आहे. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे
आहेत. शाळकरी मुले, नागरिक, वाहनधारक, शेतकरी, रुग्णांना याचा फटका बसत आहे. ही समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत महेश पाटील यांनी या खड्डयात बसून खासदार विशाल पाटील यांचा निषेध नोंदविला.