मोठी बातमी! आजपासून दहा दिवस ……

बॉलीवुडने 2024 हे वर्ष चांगलच गाजवलं. पण 2024 च्या सुरुवातीपासूनच दाक्षिणात्य चित्रपटांनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. तेजा सज्जा (Teja Sajja) आणि प्रशांत वर्मा (Prashant Varma) यांचा ‘हनुमान’ (Hanuman) या वर्षातला पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट होता. या चित्रपटाने महेश बाबूच्या (Mahesh Babu) ‘गुंटूर कामर’ (Guntur Kaaram) आणि धनुषच्या (Dhanush) ‘कॅप्टन मिलर’ (Captain Miller) सारख्या चित्रपटांना मागे टाकलं. आतापर्यंत अनेक मेगा बजेट चित्रपट रिलीज झालेले नाहीत.

अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) पासून ते प्रभासच्या (Prabhas) ‘कल्कि 2898 एडी’ (Kalki 2898 AD) आणि रामचरण (Ramcharan) आणि ज्युनिअर एनटीआरचे (JR NTR) चित्रपट या वर्षात धमाका करण्यासाठी सज्ज आहेत. पण तरीही तेलंगाणामध्ये 10 दिवस चित्रपटगृह बंद असणार असल्याचं समोर आलं आहे.टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीच्या पदरी गेल्या काही दिवसांपासून निराशा येत आहे. लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2024) आणि आयपीएलमुळे (IPL 2024) अनेक चांगल्या सिनेमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

त्यामुळे आता तेलंगणातील अनेक सिंगल स्क्रीन्स थिएटर्सने काही दिवसांसाठी सिनेमागृह बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळए सलग होणाऱ्या नुकसानापासून त्यांचा बचाव होईल. 17 मेपासून 10 दिवस तेलंगणातील चित्रपटगृह बंद असणार आहेत. कदाचित जून महिन्यात चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्यात येऊ शकतात.