आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. त्यासोबतच तापमानामध्ये वाढ होऊन उकाडा जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुणे शहरात उष्णतेचा पारा मागील दोन दिवसांपासून वाढला आहे.त्यामुळे विश्रांती घेतलेला अवकाळी पाऊस पुन्हा दोन ते दिवस शहरात हजेरी लावणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आला होता.
सोलापूर, कोल्हापूर, जालना, सिंधुदुर्ग, नगर, सांगली, ((Rain Alert Maharashtra) बीड, नांदेड, परभणी, बुलढाणा, धाराशिव, लातूर, हिंगोली, अकोला, अमरावती, वाशीम या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासाठी येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील हवामान विभागाने केलं आहे.