Free OTT Platforms List : मोफत वेब सीरिज, चित्रपट पहायचे तर……

अनेकजण सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या (OTT Platforms) पर्यायाला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. कधीही आणि कुठेही वेब सीरिज, चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येतात.त्यामुळेच मागील काही वर्षांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सब्सक्रिप्शनमध्ये वाढ होत असल्याचे दिसते.

मात्र, अनेकजण ओटीटी सब्सक्रिप्शनसाठी पैसे खर्च करत नाहीत. वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मची वेगवेगळे दर असल्याने अनेकजण काही मोजक्याच ओटीटी प्लॅटफॉर्मचे शुल्क भरतात. मात्र, काही ओटीटी प्लॅटफॉर्म असे आहेत, ज्यावर तुम्हाला मोफत चित्रपट, वेब सीरिज पाहता येईल.

एमएक्स प्लेअर (MX Player)

MX Player वर पाहण्यासाठी भरपूर मोफत कंटेट उपलब्ध आहे. MX Video Player पूर्वी ऑफलाइन व्हिडिओ प्लेअर होता, तो नंतर अपडेट केला गेला. येथे तुम्ही सर्व प्रकारच्या भाषांमधील चित्रपट आणि वेब सीरिजचा आनंद घेऊ शकता. एमएक्स प्लेअरवर रिलीज झालेल्या काही वेब सीरिज चांगल्याच गाजल्या.

जिओ सिनेमा Jio Cinema

मनोरंजनासाठी जिओ सिनेमावर खूप कंटेट आहे. या ठिकाणी तुम्ही मोफत चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता. मात्र, त्यासाठी तुमच्याकडे जिओचे सीम कार्ड हवे. जर, तुमच्याकडे जिओचे सीम कार्ड नसेल तर तुम्ही जिओचा फोन क्रमांक नमूद करून लॉग इन करू शकता. त्याशिवाय, वूट अॅपचा कंटेटही तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता.

पिकासो Picasso

पिकासो या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तुम्ही वेब सीरिज, चित्रपट पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला अॅप डाउनलोड करून लॉग इन करावे लागेल.

टूबी Tubi Tv

टूबी अॅपवर तुम्ही मोफत हॉलिवूड चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता. जर तुम्हाला मोफत कोणत्याही जाहिरातीशिवाय वेब सीरिज पाहायची असेल तर तुम्ही पाहू शकता.

एक्स स्ट्रीम Xstream Play

या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही बॉलिवूड, हॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट पाहू शकता. त्यासाठी तुमच्याकडे एअरटेलचे सीम कार्ड हवे.त्याशिवाय, डिस्ने हॉटस्टार प्लसवर ही तुम्ही काही निवडक मालिका, चित्रपट मोफत पाहू शकता. त्याशिवाय, अॅमेझॉन मिनी टीव्हीवरही तुम्ही मोफत वेब सीरिज, मालिका पाहू शकता.