विशाल पाटलांचं संजयकाकांना प्रत्युत्तर

सांगली लोकसभा निवडणुकीच्या (Sangli Lok Sabha Election) मतदानानंतर भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांची एकमेकांवर टीका-टिप्पणी सुरुच आहे.दुसरीकडे दोघांनीही आपल्याच विजयाचा दावा केलाय. मात्र हा दावा करत असताना दोघांनीही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडली नाही.

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कामाला आला, असं संजयकाका पाटील म्हणाले होते. त्यावर आम्ही विरोधकांकडून अपेक्षा ठेवत नाही कारण माझा दोस्त दिलदारच आहे, असं उत्तर विशाल पाटील यांनी दिलं. त्यामुळे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आणि निकालाची उत्सुकता असताना या दोन नेत्यांच्या एकमेकांवरील आरोपाच्या सत्रामुळे सांगलीचे वातावरण अजूनही तापलेलं दिसून येत आहे.सहानभुतीच्या जोरावर निवडणूक खेळता येते पण केवळ सहानभुतीवर लोक मतदान करत नाहीत असे म्हणत सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजय काकांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना टोला लगावला होता.

यावर विशाल पाटील यांनी मावळते खासदार म्हणून संजय काका पाटलांचा उल्लेख करत संजय काका पाटील महिन्याभरापासून वैफल्यग्रस्त होते. त्याचा राग मतदानानंतर देखील अधिकच वाढलेला दिसून येतोय असं म्हणत संजयकाका पाटील यांना आपला पराभव दिसू लागलाय असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.