प्रतिक पाटलांचं गाणं अन् कार्यकर्त्यांचा जबराट डान्स!

लोकसभा निवडणुकीसाठी हातकणंगलेमधून प्रतीक पाटील यांचे नाव चर्चेत असतानाच प्रतीक पाटील यांनी म्हटलेलं हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘अरे दिवानो, मुझे पेहचानो, कहा से आया मै हु डॉन’ हे गाणं म्हटलंय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांनी.

प्रतीक पाटील हे एका स्टेजवर हातात माईक घेऊन गाणं म्हणत आहेत, तर त्यांचे कार्यकर्ते या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. अतिशय शांत आणि सोज्वळ स्वभावाचे असणारे प्रतीक पाटील हे मै हु डॉन गाणं म्हणून नेमका कोणाला इशारा देत आहेत याची चर्चा आता सांगली जिल्ह्यासह हातकणंगले तालुक्यात रंगली आहे.