कोरोचीत क्रिकेट मैदानाची उभारणी

रणजी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामध्ये इचलकरंजी शहरातील खेळाडू चमकावेत या उद्देशाने खेळाडू निर्माण
करण्यासाठी कोरोची येथील पाच एकर जागेवर सुसज्ज आणि सर्व सोयीने युक्त मैदान उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी सुमारे ८० खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती. चॅम्पियन सहारा क्रिकेट अकॅडमीचे युवराज येवलुस्कर, आनंद दोपारे, हरीश खंडेलवाल, भरत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येवलुस्कर म्हणाले, रणजी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी खेळाडू तयार करणे हा प्रमुख उद्देश असून या ठिकाणी ५ ते १९ वर्षांपर्यंतच्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले जात आहे. अकॅडमीचे १० हून अधिक खेळाडू महाराष्ट्र संघाकडून निवडले असून कोल्हापूर जिल्हा संघ आणि पुण्यातील क्लबकडून ३० खेळाडू निवडले गेले आहेत. या ठिकाणी गवत आणि सिमेंटचे विकेट आहेत टर्फ विकेटची सोयही या ठिकाणी उपलब्ध असून सहा कोच आहेत. परिसरातील गावागावात जाऊन याची माहिती देण्यात येणार आहे. चांगले खेळाडू शोधून त्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.