सांगली लोकसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना व काँग्रेस हे दोन्ही घटक पक्ष आग्रही आहेत. माझ्यासमोरच सर्व बाबी सुरू असल्यामुळे गप्प आहे. महाविकास आघाडीत दोन्ही पक्ष समान असल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्यातील पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर सांगली लोकसभा मतदार संघाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, सांगली लोकसभा मतदार संघाबाबत घटक पक्षांनी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरदचंद्र पवार) जागेची मागणीच केलेली नाही. दोन्ही पक्ष आघाडीचा घटक आहेत. हे सर्व माझ्यासमोरच घडत असल्यामुळे गप्प आहे. या विषयी मी बोलणे योग्य ठरणार नाही. दोन्ही पक्षांनीच समाधानकारक निर्णय घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.