मतमोजणीची ठिकाणे निश्‍चित…..

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारनंतरच निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मतमोजणीसाठी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघासाठी जवळपास ५०४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे

मतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून निवडणूक आयोगाकडे ठिकाणांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. ते प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यानुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय गोदाम येथे तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी ही राजाराम तलाव येथील शासकीय गोदाम येथे होणार आहे.