आम. डॉ. आवाडे व आम. डॉ. माने यांनी घेतली आमदारकीची शपथ

इचलकरंजीचे नवनिर्वाचित आमदार डॉ. राहुल आवाडे तसेच हातकणंगलेचे आमदार डॉ. अशोकराव माने यांनी रविवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये आमदारकीची शपथ घेतली. या दोघांनीही छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करीत शपथ घेतली.