आळतेत उपचाराच्या नावाखाली रुग्णांच्या जीवाशी खेळ….

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. नवीन आलेले पाणी व बदलत्या हवामानाचा काही नागरिकांच्या आरोग्यावर
परिणाम होत आहे. यातून तापाच्या आजारासह अंशतः डेगू सारखे आजार फैलावत आहेत. त्याचाच फायदा घेऊन काही माहीर डॉक्टर रुग्णांची आर्थिक लूट करून मालामाल होत आहेत.काही डॉक्टर रुग्णांना ८०० ते १२०० रुपयात योग्य उपचार करून रुग्णास बरे करीत आहेत.

आळते पंचक्रोशीत जवळपास ४० ते ५० डॉक्टर आहेत. त्यातील काही डॉक्टरांनी माफक खर्चातुन योग्य उपचारातून आपल्या नावाचा नावलौकिक मिळविला आहे. तर काही डॉक्टर वातावरणातील हवामानाच्या काही डॉक्टर त्याच आजारास रुग्णांना चुकीची माहीती देवुन भिती घालतआहेत. उपचारासाठी दहा ते बारा हजार रुपये उकळून लूट करीत आहेत. यातून अलीकडच्या काळात चुकीच्या पद्धतीने उपचार करून काही डॉक्टर मालामाल झाले आहेत. अशा काही डॉक्टरांच्या उपचाराकडे संशयाची पाहिले जात आहे.

अशा अनेक डॉक्टरांमुळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम होत आहे.डॉक्टरांमुळे आळते पंचक्रोशीतील काही डॉक्टरांच्या नावाची वाईट चर्चा होत असून नागरिकामधून त्या डॉक्टरांच्या उपचाराकडे संशयित नजरेने पाहीले जात आहे. तसेच उपचाराच्या नावाखाली रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या काही डॉक्टरांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून त्यामुळे भविष्यकाळात याचा फटका रुग्णांना बसणार आहे. संबंधित सरकारी यंत्रणेने अशा चुकीच्या पद्धतीने उपचार करून रुग्णांना लुटणाऱ्या डॉक्टरांवर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.