पोसेवाडी येथे पारायण सोहळा सुरु

खानापूर तालुक्यातील पोसेवाडी येथील श्री जोगेश्वरी मंदिर येथे दि. १७ ते २४ पर्यंत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या पारायण सोहळ्यामध्ये तुकाराम महाराज हजारे शिरूर बेळगाव, अर्जुन महाराज मोटे पळशीकर जालना, कबीर महाराज आतार खेड शिवापूर, पुणे, गजानन महाराज पुणे, अमोल महाराज घुगे अकोला, अनिल महाराज तुपे नाशिक, सागर महाराज बोराटे नातेपुते व भागवताचार्य जनार्दन महाराज रजपूत धुळे यांची कीर्तने होणार आहेत. तसेच या सोहळ्यामध्ये भानुदास सीताराम जाधव, हनुमंत वामन कुरवडे कोल्हापूर यांची प्रवचने होणार आहेत.