तारदाळ येथील प्रकारशासनाच्या वतीने रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन धान्य दिले जाते. मात्र तारदाळ येथील रेशन दुकानातून निकृष्ट दर्जाचे धान्य वितरीत केले जात आहे. यामध्ये दिला जाणाऱ्या तांदळातून मोठ्या प्रमाणात अळ्या सापडल्याने ग्राहकातून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळू नये तसेच चांगल्या दर्जाचे धान्य वितरीत करावे, अशी मागणी नागरिकातून होत आहे.
तारदाळ येथील गावभाग परिसरातील रेशन धान्य दुकानातून अनेक ग्राहकांनी धान्याची उचल केली. यामध्ये दिल्या गेलेल्या
तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात अळ्या मिळून आल्या. तांदळातून कीडे तसेच मोठ्या प्रमाणात अळ्या सापडल्या आहेत. अशा निकृष्ट दर्जाचा तांदूळ गोरगरिबांच्या माथी मारून जीवाशी खेळण्याचा प्रकार शासनाने करू नये, रेशन धान्य दुकानदारांनी निकृष्ट दर्जाचा तांदूळ स्वीकारू नये व भेसळयुक्त धान्याचे वितरण गावोगावी रोखावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.