महापुराच्या काळात महत्वाचा मार्ग अंकलखोप पलूस तालुक्यातील संतगाव औदुंबर मार्गावर आमणापूर पुलापर्यंत दोन किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे, तरी हा पूर पट्ट्यातील रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.औदुंबर, आमणापूर पूल तसेच अंकलखोप, सूर्यगाव, नागठाणे, वाळवा गावात जायला हा मार्ग एकदम जवळचा आहे.
सध्या संतगाव गावातील प्रवासी, नागरिक यांना, क्रांती साखर कारखाना, सोनहिरा कारखाना, पलूस, आमणापूर विटा, कडेगाव, अशा ठिकाणी जायला मधला मार्ग सोयीस्कर आहे.सदरचा रस्ता अल्पावधीतच खराब झाला आहे. गेली अनेक वर्षे रस्त्याची दुरवस्था आहे. जागोजागी रस्ता खचून मोठमोठे खड्डे पडले संतगाव-औदुंबर (ता. पलूस) मार्गावर आमणापूर पुलापर्यंत दोन किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. आहेत.
ऊस हंगामात भागातील सर्व साखर कारखान्यांना या मार्गाने सर्व वाहतूक सुरू असते.महापुराच्या काळात नदीपात्र वाढत असताना मळीभाग, संतगाव येथील नागरिकांना बाहेर पडण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असूनही प्रशासनाकडून दुर्लक्षित आहे.तरी संबंधित अधिकारी, स्थानिक आमदार, खासदार यांनी तातडीने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत.