सांगोला तालुक्यातील नाझरे येथील वीरभद्र मंदिरात जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 2 डिसेंबर अखेर अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात दररोज पहाटे पाच ते सहा श्री स रुद्राभिषेक, सकाळी नऊ ते 11 परम रहस्यग्रंथांचे सामुदायिक पारायण, सायंकाळी चार ते पाच वीरशैव भजनी मंडळाचे व रंगनाथ स्वामी भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी सहा ते सात शिवपाठ व सायंकाळी साडेसात ते साडेआठ श्री श्री श्री श्री 108 श्री गुरु महादया रविशंकर शिवाचार्य महाराज राय पाटणकर यांचे प्रवचन, महारथी व महाप्रसाद वाटप होईल.
सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी पहाटे साडेचार ते साडेपाच श्री स रुद्राभिषेक सकाळी सहा ते साडेसहा षडाक्षरी मंत्राचा सामुदायिक जप व साडेसहा ते पावणे सात राय पाटणकर महा स्वामींचे आशीर्वचन व सूर्योदयाला ठीक सकाळी 6: 57 वाजता श्री सपुष्पृष्टी होईल. त्यानंतर महाआरती व श्रीची नाझरे गावातून भव्य मिरवणूक व महाप्रसाद वाटप होईल. तरी शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त वीरशैव समाज नाझरे, वझरे, कारंडेवाडी यांनी केले आहे.