सांगोला शहरांमध्ये वाढला डासांचा प्रादुर्भाव

सांगोला शहरांमध्ये डासांचे साम्राज्य वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिकेने औषध फवारणी व धूर फवारणी करून घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. शहरांमध्ये घराच्या कडेने तसेच गटारीमध्ये पाणी साठून राहिल्याने त्या ठिकाणी दुर्गंधी निर्माण झालेली आहे. शहर व उपनगरात अनेक परिसरामध्ये मोकळ्या जागेमध्ये काटेरी झुडपे, गवत तसेच अनेक ठिकाणी पाणी साचून आहे. त्यावरती डासांचा वावर वाढला आहे.

काही ठिकाणी गवत वाढल्या कारणाने या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर ढास वाढत आहेत. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे डासापासून होणारा नागरिकांचा त्रास वाचवण्यासाठी सांगोला नगरपालिकेच्या औषध विभागाने औषध व धूर फवारणी करणे आवश्यक आहे असा सूर नागरिकांमध्ये उमटू लागला आहे.