सोलापुरात बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी….

सोलापूर जिल्ह्यात 3974 विद्यार्थी अनुत्तीर्ण !बारावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी; मंगळवेढा, मोहोळ, सांगोल्याचा निकाल सर्वाधिक; 16 जुलैपासून पुरवणी परीक्षा इयत्ता बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ३२ हजार १७५ मुलांपैकी २९ हजार २३७ तर २४ हजार ४२४ मुलींपैकी २३ हजार ३८८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्व शाखांमधील मुलांचा निकाल ९०.८६ टक्के तर मुलींचा निकाल ९५.७५ टक्के लागला असून जिल्ह्याच्या एकूण निकालाची टक्केवारी ९२.९७ टक्के आहे.

पुणे विभागात पुण्याचा निकाल ९३.२० टक्के लागला असून सोलापूरने यंदा नगरला (९२.३३ टक्के) मागे टाकत विभागात दुसरा क्रमांक पटकावला आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा बैठे पथकांसह भरारी पथकांची संख्या वाढविण्यात आली होती. त्यामुळे यंदा निकालाच्या एकूण टक्केवारीत घट झाल्याचे चित्र असून कला शाखेचा निकाल सर्वात कमी झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, मोहोळ व सांगोला या तीन तालुक्यांचाच निकाल ९५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत दोन हजार ९३८ मुले तर एक हजार ३६ मुली अनुत्तीर्ण झाल्या आहेत.