उजनी धरणाच्या पाणीपातळीत घट….

उजनी धरणाच्यापाणी पातळीत दररोज कमालीची घट होत आहे. धरण सध्या मायनस ५७ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे उजनी धरणावर अवलंबून असलेल्या ४१ विविध योजनांपैकी जवळपास सर्वच योजना आता बंद करण्यात आल्या आहेत.
यामुळे सोलापूर, पुणे, नगर व धाराशिव या चार जिल्ह्यांची भविष्यातील पाण्यासाठी धक धक वाढली आहे. सोलापूर शहरासाठी २२ मे पर्यंत भीमा नदीतून पाणी सोडण्यात येणार असून, सध्या चार हजार क्युसेसने ते सुरू आहे. सोलापूर, पुणे जिल्ह्यासह उजनी धरण क्षेत्रात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही.

सोलापूर, पुणे आणि जिल्हाांसह अहमदनगर मराठवाड्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती आहे. इतिहासात प्रथमच तालुका नीचांकी पाणीसाठा अनुभवत आहे.पाणीसाठ्यात कमालीची घट झाल्याने उजनी धरणावर अवलंबून असलेल्या अनेक गावांत सध्या दुष्काळजन्य स्थिती निर्माण झालेली आहे. सध्या सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनी धरणातून ६००० क्यूसेसने पाणी सोडले जात आहे.सोडलेले पाणी पंढरपूरपर्यंत पोहोचले असून तीन-चार दिवसांत सोलापूरला पाणीपुरवठा करणान्या औज बंधाऱ्यात पोहोचल्यानंतर पुन्हा चार-पाच दिवस पाण्याचा विसर्ग सुरू राहण्याचा अंदाज आहे. परिणामी उजनीची पातळी अत्यंत खोलवर जाण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी, शेतकऱ्यांनी पाण्याचा दुरुपयोग टाळावे.