विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी महिलाना स्वःतालुक्यामध्येच….

आटपाडी तालुका शिक्षक समितीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या कामासंदर्भात सर्व महिला शिक्षक स्व:तालुक्यातच निवडणूक आदेश द्यावेत, तसेच दिव्यांग शिक्षकांना निवडणुक कामातून मुक्त करावे व ५३ वर्षावरील शिक्षकांना शारीरिक व आरोग्याच्या समस्या असल्याने निवडणूक काम देऊ नये याबाबतचे निवेदन शिक्षक समिती आटपाडी कडून तहसिल कार्यालयास देण्यात आले आहे. यासाठी निवडणुक आयोग सहकार्य करेल अशी आशा आटपाडी समितीने केली आहे. यावेळी शिक्षक बँक माजी चेअरमन यु टी जाधव, शिक्षक नेते शामराव ऐवळे, केंद्रप्रमुख शिक्षक प्रविण बाड सर, डॉ आंबेडकर शाहू फुले रुग्णालयाचे संचालक श्रीकांतराजे कुंभार, तालुकाध्यक्ष संजय कबीर सर आदी उपस्थित होते .