आटपाडीत तलाठी कोतवाल संघटनेकडून पेढे वाटून आनंद साजरा! तलाठी व कोतवाल नावामध्ये बदल….

महसूल विभागातील तलाठी संवर्गाच्या पदनामात बदल करून ग्राम महसूल अधिकारी असे पदनाम करण्याची विनंती महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांच्याद्वारे करण्यात येत होती. महसूल विभागातील तलाठी संवर्गाच्या पदनामात बदल करून ग्राम महसूल अधिकारी असे पदनाम करण्यात आले आहे. राज्यातील कोतवालांनी मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधींना केलेल्या विविध मागण्यांमध्ये कोतवाल पदाचे पदनाम बदलून महसूल सेवक करावे, अशी मागणी केलेली होती.

राज्य शासनाच्या समितीने कोतवाल पद हे ब्रिटीश काळापासून अस्तित्वात असल्याने कोतवाल पदाचे पदनाम महसूल सेवक करण्यात यावे, अशी शिफारस केली आहे. त्यानुषंगाने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोतवाल पदाचे पदनाम बदलून महसूल सेवक करण्यात आले आहे. या निर्णयाने आटपाडी तालुक्यातील तलाठी कोतवाल संघटनेकडून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.