मोठी संधी!भारतीय वायू दलात भरती सुरू….

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून आजपासून भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. चला तर मग अर्ज करा. ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही मोठी संधी आहे. भारतीय वायुसेनेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया आणि भरतीबद्दल अधिक.

भारतीय वायुसेनेकडून ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी आजपासून आपण अर्ज ही करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 जून 2024 आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. इच्छुकांनी शेवटच्या तारखेच्या अगोदरच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरतीसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये.

ही भरती प्रक्रिया वाय वैद्यकीय सहाय्यक (मेडिकल असिस्टंट) या पदासाठी सुरू आहे. airmenselection.cdac.in या साईटवर जाऊन आपण भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. वयाच्या अटीसोबतच शिक्षणाची अटही भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलीये. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजीमध्ये बारावीत उमेदवाराला 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी सर्वात अगोदर उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. त्यानंतर शारीरिक तंदुरुस्ती देखील उमेदवारांना द्यावी लागेल. लेखी परीक्षा आणि अनुकूलता चाचणी दिल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला भरती प्रक्रियेच्या अधिसूचनेवर मिळेल.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरतीसाठी अर्ज करावीत. airmenselection.cdac.in या साईटवर आपल्याला भरतीची सविस्तर माहिती मिळेल. https://airmenselection.cdac.in/CASB/img/notice/Adv_Medical_Asst_Rally_01_25.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचण्यास मिळेल.