MSRTC Bharti 2024: एसटी महामंडळात नोकरीची संधी! आत्ताच करा अर्ज

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता तरुणांना एसटीमध्ये भरती होण्याची उत्तम संधी आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एसटीमध्ये ही भरती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागात पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. वृत्तानुसार, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात ही भरती केली जणार आहे.

येथे लिपिक, सहाय्यक, शिपाई आणि इलेक्ट्रिशियन पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यवतमाळ एसटी महामंडळात या भरतीअंतर्गत एकूण 68 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पात्रता आणि वयोमर्यादा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळच्या या भरतीसाठी आवश्यक पत्रतेबद्दल बोलायचे झाल्यास अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी पास किंवा आयटीआय किंवा डिप्लोमा घेतलेला असणे अवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय 18 ते 35 वयोगटातील असणे आवश्यक आहे. ही पात्रता पूर्ण करू शकणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात.

उमेदवारांना या अर्ज करण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेसस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल.