इस्लामपूर सुपर भाजी मार्केटच्या कल्पनेतून बाहेर येण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. नियोजित सुपर भाजी मार्केटच्या शुभारंभाची कोनशिलासुद्धा उभारली आहे. त्याच परिसरातील दत्त मंदिरासमोरील नेहमीच गटारी तुंबलेल्या असतात. परिणामी इस्लामपूर पालिकेने दुर्गंधी कचऱ्याची संस्कृतीच जोपासल्याचे दर्शन घडते.शहरात गुरूवारी आणि रविवारी आठवडी बाजार भरतात त्याच बरोबर दररोज सायंकाळी मोठ्या प्रमाणात भाजी मार्केट असते. याठिकाणी नियोजित सुपर भाजी मार्केट करण्याची घोषणाही केली आहे. याला आवश्यक असणारा फंडही उपलब्ध आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र मार्केट उभारणीला सुरूवात झालेली नाही.
त्यामुळेच या परिसरात भाजी विक्रेते आणि ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते तरीसुद्धा पालिका प्रशासन मुख्य बाजार पेठेतील दत्त मंदिरासमोर नेहमीच तुंबलेल्या अवस्थेतील गटारी. आणि स्वच्छता ठेकेदार स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत. परिणामी दत्त मंदिरासमोरील गटार तुंबलेली दिसते.शहरातील विविध ठिकाणी असलेल्या स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. परंतु नेहमीच ग्राहकांची वर्दळ असणाऱ्या मुख्य बाजारपेठेतील स्वच्छता वेळेवर होत नाही. स्वच्छता ठेकेदारांकडून गुरूवारी भरलेल्या बाजारातील कचरा शुक्रवारी जुजबी पद्धतीने उचलण्यात येतो.
अशीच स्वच्छता रविवारच्या बाजारच्या दुसऱ्या दिवशी दिसते परंतु तुंबलेल्या गटारीकडे दुर्लक्ष केले जाते.बाजारात येणाऱ्या विक्रेत्यांना पालिकेकडून शिस्त लावणे गरजेचे आहे. सायंकाळी भाजीपाल्याचा कचरा गटारीत टाकणे किंवा बसलेल्या ठिकाणीच टाकून जाणे त्यामुळेच रोजच कचऱ्याचे ढीग दिसतात. विक्रेत्यांनाच आपआपला कचरा गोळा करून संकलित करण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती, इस्लामपूर गटारीसमोरच दत्त मंदिर आहे. या ठिकाणी नियमित सकाळी पाटपूजन दुर्गंधीने केले जाते. याकडे बाजार असोसिएशनच्या प्रतिनीधींचेही लक्ष्य नसते. याबाबत बाजारकरी असोसिएशनचे प्रतिनिधी अनिल पावणे यांच्याशी संपर्क साधला असता मुळातच त्या ठिकाणी अरूंद गटार आहे. त्यामुळे या गटारीचे पाणी इतरत्र वाहून जात नसल्याने याची दक्षता पालिका प्रशासनाने घ्यावी, असा पावणे यांचा दावा आहे. अशीच परिस्थिती शहरातील बहुतांशी गटारींची आहे.