चांगल्या आणि व्याधीमुक्त आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि पोषक आहार घेण्याचा सल्ला तज्ञ देतात. (Healthy Diet) मात्र याबरोबरच चांगली जीवनशैली आत्मसात करण्याबद्दल देखील ते सूचना करतात.आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत चाललेल्या अकाली समस्यांचा टक्का पाहता, अनेक वाईट सवयीमुळे नानाविध आजार लोकांना होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी एक सवय म्हणजे जेवल्यानंतर लगेचच केल्या जाणाऱ्या काही गोष्टी. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या जेवल्यानंतर लगेचच करू नये? जाणून घेऊया याबद्दल सविस्तर आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेकदा लोक जेवल्यानंतर काही चुका करतात, ज्यामुळे त्यांचा फिटनेस तर खराब होतोच शिवाय शरीर विविध आजारांचे घर बनू शकते. म्हणून जेवल्यानंतर कोणत्या गोष्टी करणे टाळायला हवे याबद्दल जाणून घेऊया.
जेवल्यानंतर कोणती कामे करू नये?
पोटभरून जेवल्यानंतरही जर तुम्हाला अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असेल, तर तुम्ही जेवणानंतर करत असलेल्या या काही गोष्टी आत्ताच थांबवा. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की कोणती कामे जेवल्यानंतर अजिबात करू नयेत.
पाणी पिणे
पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते, पण जेवल्यानंतर लगेच ते गटागट आणि प्यायल्याने दुष्परिणाम होऊ शकतो. यामुळे तुम्हाला अपचनाचा त्रास तर होतोच पण त्यामुळे ॲसिडीटी आणि गॅसचीदेखील समस्या होऊ शकते.
धुम्रपान
अन्न खाल्ल्यानंतर धुम्रपान करण्याची तीव्र इच्छा जाणवत असेल, तर ही सवय मोडायला हवी. असे केल्याने तुम्हाला इरिटेबल बोवेल सिंड्रोमची समस्या होऊ शकते आणि अल्सरचा धोकाही वाढू शकतो.
व्यायाम
अन्न खाल्ल्यानंतर सामान्य चालणे ठीक आहे, परंतु त्यानंतर जर तुम्ही व्यायाम सुरू केला तर ते तुमच्या आरोग्यासाठी समस्या निर्माण करू शकते. कारण, यामुळे तुम्हाला उलट्या, मळमळ, पोटदुखी आणि पचनाशी संबंधित अनेक मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
झोपायला जाणे
खाल्ल्यानंतर लगेचच झोपायला जाण्याची सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. यामुळे छातीत जळजळ, घोरणे ते स्लीप एपनियासारखी समस्या उद्भवू शकतात. ज्यामध्ये श्वास घेण्यात अडचण येते.
आंघोळ
उन्हाळ्यात अनेकांना रात्रीच्या जेवणानंतर आंघोळ करायला आवडते. मत असे करणे चुकीचे आहे. जेवल्यानंतर पचनक्रिया सर्वात जास्त सक्रिय असते, परंतु आंघोळीमुळे तुमच्या शरीराचे तापमान बदलते आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही.