एकात्मिक आरोग्य अभियान अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे बुधवार दि. १२ मार्च रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबीर आयोजित केल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरदास यांनी दिली. या शिबिरात हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब, अस्थिरोग, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, गुप्तरोग, हिवताप, क्षयरोग या सर्व तपासण्या केल्या जाणार आहेत.
मानसिक आरोग्य उपचार व समुपदेशन केले जाणार आहे. या शिबीरात आरोग्यविषयक प्रश्नांसाठी मार्गदर्शन केले जाणार असून या शिबिराचा फायदा वाळवा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.